नक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना

The end of Naxalism is near; Make them financially strapped; Important note from Home Minister Amit Shah

Home Minister Amit Shah : देशात डाव्या चळवळीने सुरू केलेल्या नक्षलवादाचा शेवट जवळ आलाय. त्यांची आर्थिक कोंडी करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक अमित शहा यांनी घेतली. त्यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखून नक्षलवाद कसा संपुष्टात आणता येईल याचे विवेचन केले. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. The end of Naxalism is near; Make them financially strapped; Important note from Home Minister Amit Shah


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात डाव्या चळवळीने सुरू केलेल्या नक्षलवादाचा शेवट जवळ आलाय. त्यांची आर्थिक कोंडी करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक अमित शहा यांनी घेतली. त्यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखून नक्षलवाद कसा संपुष्टात आणता येईल याचे विवेचन केले. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, तेलंगण या राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच केंद्रातले अन्य मंत्री उपस्थित होते.

डाव्या चळवळीने देशात रुजविला. नक्षलवादाने गेल्या ४० वर्षात १६००० नागरिकांचे बळी घेतले. परंतु आता नक्षलवाद अखेरची घटका मोजतो आहे. त्याच्यावर कुठार आघात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी समन्वय साधून पावले उचलली तर तो लवकर संपुष्टात येईल. येत्या वर्षभरात त्यासाठी आपण एक प्रबळ यंत्रणा उभी करू, अशी सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

डाव्या चळवळीने सुरू केलेल्या नक्षलवाद्यांची आर्थिक कोंडी केली, त्यांचे आर्थिक मदत मिळण्याचे सर्व मार्ग बंद केले की त्यावर प्रभावीपणे नियंत्रण आणता येईल याकडे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून लक्ष केंद्रित करावे. येत्या वर्षभरात त्याचा परिणाम आपल्याला दिसू शकेल, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयातून प्रबळ यंत्रणा उभी करण्याच्या सूचनेला पाठिंबा दिला.

The end of Naxalism is near; Make them financially strapped; Important note from Home Minister Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात