मुंबई-पुण्यात झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रचार – प्रसार; मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केली चिंता

Propagation of Naxal movement in slums in Mumbai-Pune; The Chief Minister expressed concern to Amit Shah

Naxal movement in slums : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो आहे. ही गंभीर बाब असल्याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त केली आहे. मुंबई – पुण्याबरोबरच अन्य शहरांमध्येही झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीचा प्रचार – प्रसार सुरू आहे. त्यावर अंकुश लावला पाहिजे, असे परखड मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. Propagation of Naxal movement in slums in Mumbai-Pune; The Chief Minister expressed concern to Amit Shah


प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो आहे. ही गंभीर बाब असल्याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त केली आहे. मुंबई – पुण्याबरोबरच अन्य शहरांमध्येही झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीचा प्रचार – प्रसार सुरू आहे. त्यावर अंकुश लावला पाहिजे, असे परखड मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमित शहा यांनी नक्षलवाद प्रभाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, मुख्य सचिवांची आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतली तिला नवी दिल्लीत उपस्थित राहिले. परंतु बैठकीनंतर ते लगेच मुंबईकडे रवाना झाले. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली नाही.

तत्पूर्वी, या बैठकीत नक्षलवादग्रस्त राज्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ओरिसा, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्थे बरोबरच अमित शहा यांनी नक्षलग्रस्त भागांमधल्या विकास कामांचाही आढावा घेतल्याचे समजते. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीच्या प्रसार-प्रचार याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे त्यांच्यासमवेत बैठकीला उपस्थित होते.

Propagation of Naxal movement in slums in Mumbai-Pune; The Chief Minister expressed concern to Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात