काँग्रेसची चिंतन चतुराई : नेत्यांच्या घराणेशाहीवर कसणार लगाम… पण गांधी घराणे सोडून!!

काँग्रेसमध्ये हडकंप होऊ घातला आहे. कारण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या आज पासून सुरू होणाऱ्या उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात या संदर्भात 2 प्रस्ताव येणार आहेत. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख अजय माकन यांनी ही माहिती दिली आहे.
The dynasty of leaders will be curbed … but leaving the Gandhi dynasty

आता काँग्रेसच्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसणार म्हणजे गांधी घराण्याचे काय होणार?? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण थांबा… ही काँग्रेस आहे… स्वातंत्र्यानंतर देशावर तब्बल 5 दशके राज्य करणारी काँग्रेस आहे… त्यामुळे अशा प्रस्तावांमधून गांधी घराण्याला धक्का लागेल अथवा तोशीस लागेल असे करायला काँग्रेसजन दुधखुळे नाहीत. काँग्रेसच्या चिंतन शिबिरातून येणाऱ्या या 2 प्रस्तावांमध्ये काँग्रेस नेत्यांनी अशी काही “चिंतन चतुराई” साधली आहे, की त्यामुळे गांधी घराणेशाहीला किंचितही धक्का लागणार नाही अथवा तोशीस पडणार नाही…!!

– 5 वर्षे पद, 3 वर्षे कूलिंग

काँग्रेसच्या पहिल्या प्रस्तावानुसार कोणत्याही व्यक्तीला 5 वर्षांनंतर एकाच पदावर राहता येणार नाही. ते पद त्या व्यक्तीला सोडावेच लागेल. याचा अर्थ काँग्रेसच्या अध्यक्षपदी एखादी व्यक्ती निवडली गेली तर ती फक्त 5 वर्षांसाठी असेल. अर्थातच हा कोणत्याही लोकशाही तत्वाला अनुसरून असाच प्रस्ताव आहे.

 

– राहुल गांधींसाठी सोय

पण प्रस्तावातली खरी गंमत पुढे आहे… 5 वर्षे पद भोगणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाचा कूलिंग पिरियड असेल. म्हणजे 3 वर्षे त्या पदापासून दूर राहून 3 वर्षानंतर संबंधित व्यक्ती त्याच पदावर परत विराजमान होऊ शकते. याचाच राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान करण्याची ही सोय केली आहे हे उघड आहे!! राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडून 3 वर्षे पूर्ण होत आहेत. आता त्यांचा 3 वर्षांचा कूलिंग पिरियड गृहीत धरून त्यांना 3 वर्षानंतर म्हणजे लगेच पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान केले जाऊ शकते. यासाठीच या प्रस्तावात 3 वर्षांच्या कूलिंग पिरियडची मेख मारल्याचे स्पष्ट होत आहे. एक प्रकारे राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या पुनरुज्जीवनाची तयारी पूर्ण होत आले याचेच हे निदर्शक आहे.

– नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम

आता दुसरा प्रस्ताव… नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसणारा. कोणत्याही नेत्याला आपल्या नातेवाईकांसाठी निवडणुकीचे तिकीट सहज मागता येणार नाही. त्या नातेवाईकाला किमान 5 वर्षे पक्षाचे काम करावेच लागेल आणि मगच तिकीट मागता येईल, असा हा दुसरा प्रस्ताव आहे. त्यामुळे वडील, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे अशांची आमदार, खासदार, नगरसेवक अशी सोय लावणे काँग्रेसच्या नेत्यांना या पुढे थोडे कठीण जाऊ शकते.

अर्थात हा प्रस्ताव देखील तितकाच चतुराईचा आहे. नेत्यांच्या नातेवाइकांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेऊन 5 वर्षे झाली, कार्यकर्ता म्हणून किरकोळ थोडेफार काम केलेले दाखवले की नेत्यांची मुले देखील तिकिटे मागायला मोकळी ठेवण्याचाच हा डाव असल्याचे बोलले जात आहे.

अर्थात काँग्रेसच्या उदयपूरच्या चिंतन शिबिरात अतिशय मोकळ्या मनाने हे दोन्ही प्रस्ताव पक्षसंघटनेत सुधारणा करण्याच्या हेतूने ठेवले जातील, असे अजय माकन यांनी जाहीर केले आहे. त्यावर काँग्रेस नेत्यांनी आणि जनतेने विश्वास ठेवला पाहिजे.

The dynasty of leaders will be curbed … but leaving the Gandhi dynasty

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात