”आता तो दिवस दूर नाही, जेव्हा  POK पुन्हा भारतात येईल” – व्ही.के.सिंह

मुस्लीम नॅशनल फोरमच्या  पीओकेसाठी तिरंगा रॅलीदरम्यान ते बोलत होते.

विशेष प्रतिनिधी

 नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी रविवारी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. माजी लष्करप्रमुख म्हणाले की, आता तो दिवस दूर नाही, जेव्हा  पीओके पुन्हा भारतात विलीन होईल . दिल्लीत राष्ट्रवादी मुस्लीम संघटनेने (मुस्लीम नॅशनल फोरम) आयोजित केलेल्या पीओकेसाठी तिरंगा रॅलीदरम्यान केंद्रीय मंत्री बोलत होते. The day is not far when POK will come back to India V K  Singh

यावेळी व्हीके सिंह म्हणाले की, पीओके आमची जमीन होती, आमचीच राहील आणि इतर कोणीही त्यावर कब्जा करू शकणार नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रजांनी षडयंत्र रचले नसते तर आमची जमीन पाकिस्तानच्या ताब्यात आली नसती, असेही ते म्हणाले.याचबरोबर ते असेही  म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा तिथल्या लोकांमध्ये ही इच्छा आणि जागृती आपोआप निर्माण होईल व ते पुन्हा आपल्यात सामील होतील.

एकीकडे सावरकरांची बदनामी, दुसरीकडे हिंदू शब्दाची नवी व्याख्या करणारे लेखन; राहुल गांधींचे दुहेरी राजकारण!!

 

मुस्लीम नॅशनल फोरमने आयोजित केलेल्या पीओकेसाठी तिरंगा रॅली लाल किल्ल्यावरून सुरूवात झाली. दिल्लीनंतर देशभरात असे १०० हून अधिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार म्हणाले की, ”या तत्कालीन सरकार आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुका होत्या, ज्यामुळे पाकिस्तानने आपल्या भूभागावर कब्जा केला.आजचे पीओके फाळणीच्या वेळी भारतात होते, तत्कालीन सरकारच्या चुकांमुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात राहिले. त्यावेळी काँग्रेस सरकार आणि पंडित नेहरू इंग्रजांच्या चक्रव्यूहात अडकले होते.”

The day is not far when POK will come back to India V K  Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात