शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत केलेल्या विधानावरून भाजपाचा आदित्य ठाकरेंवर घणाघात!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी वापरलेली वाघ नखं आता लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. सध्या ही ऐतिहासिक वाघनखं इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार याबाबत माहिती दिली असून, ते स्वत: ही वाघनखं आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून आता महाराष्ट्रात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणारं विधान केलं आहे. ज्यावर भाजपाने संतप्त प्रत्युत्तर दिलं आहे. BJP criticizes Aditya Thackeray for his statement about Shivaji Maharajs tiger claws
”महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की केवळ शिवकालीन आहे? याबाबत राज्य सरकारने सरकारने खुलासा करावा. हे शस्त्र किती वर्षांसाठी महाराष्ट्रात असणार आहे? याबाबतची माहिती सरकारने जाहीर करावी.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्यावर भाजपाने म्हटले की, ”उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितले होते. आता आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागत आहेत. शिवरायांच्या पराक्रमावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आज तुमच्या बुद्धीचे (?) धिंडवडे निघाले.”
”विद्यार्थ्याना हाताशी धरून राजकारण करू नका, आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल..”
याचबरोबर, ”आदुबाळा, वय वाढले की बुद्धी वाढतेच असे नाही. मेंदूचा विकास होतो असेही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तू देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेस. तुझ्या या बुद्धीभ्रष्ट विधानामुळे मराठी माणूस संतापला आहे. आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून वंदनीय बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल. दिल्लीच्या एका पप्पूने आधीच राजकारणात गोंधळ घातला आहे. आता तुझ्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली आहे. तू मराठी माणसाच्या नावावर कलंक आहेस.” असंही म्हणत भाजपाने संतप्त प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more