देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सुमारे 4 हजार आमदारांकडे एकूण 54,545 कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या 2023-24च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता 13.63 कोटी रुपये आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4033 पैकी 4001 आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे.The country’s 4001 MLAs have assets worth Rs 54,545 crore, more than the budgets of 3 North-Eastern statesहे आमदार 84 राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. अपक्ष 95 आमदारांकडे एकूण 2,845 कोटी रुपये आहेत. भाजपच्या 1,356 आमदारांची संपत्ती 16,234 कोटी आणि काँग्रेसच्या 719 आमदारांची संपत्ती 15,798 कोटी आहे. एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा 58.73% आहे.

यात अपक्ष आमदारांची सरासरी मालमत्ता 29.94 कोटी रुपये आहे. तर आमदारांची सरासरी मालमत्ता 13.63 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजेच सर्वात श्रीमंत वायएसआर पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या मालमत्तेची सरासरी 23.14 कोटी रुपये आहे.

The country’s 4001 MLAs have assets worth Rs 54,545 crore, more than the budgets of 3 North-Eastern states

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात