हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हरियाणातील नूहमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची धग राज्याच्या इतर भागांतही पोहोचत आहे. सोमवारी रात्री उशिरा समाजकंटकांनी गुरुग्राममधील एका धार्मिक स्थळाला आग लावली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. नूहमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.Haryana violence reaches Rajasthan; Alert issued in Uttar Pradesh too, 5 killed

मंगळवारी गुरुग्रामच्या बहादूरपूरमध्ये काही दुकानांची तोडफोड करत पेटवून दिली. हरियाणातील हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. भरतपूरमध्ये अलर्ट जारी केला आहे.



मंगळवारी भिवाडीत काही समाजकंटकांनी 5 दुकानांची तोडफोड केली आणि लोकांना मारहाणही केली. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यूपी-हरियाणा सीमेवरही गस्त वाढवण्यात आली आहे. मेरठ, अलिगड, मुजफ्फरनगरसह हरियाणातील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, हा हिंसाचार मोठ्या षड‌्यंत्राचा भाग वाटत आहे.

आज विहिंपचे देशव्यापी आंदोलन

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन म्हणाले, नूहमधील हिंसाचार दुर्दैवी आहे. जे दंगलखोरांना भडकावतात, तेच यासाठी जबाबदार आहेत. ते भडकावत असल्यानेच मोहरम आणि रामनवमी उत्सवावर हल्ले होतात. ते म्हणाले, हिंसाचाराविरोधात 2 ऑगस्ट रोजी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल.

Haryana violence reaches Rajasthan; Alert issued in Uttar Pradesh too, 5 killed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात