प्रतिनिधी
पाटणा : देशातील सर्व भाजप विरोधकांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 12 जूनला पाटण्यात बोलावलेली बैठक विरोधकांच्या सकारात्मक प्रतिसादाभावी रद्द करावी लागली. पण आता ही बैठक 23 जून रोजी घेण्याचे घाटत आहे.The canceled meeting of the opposition on June 12 is now on June 23!!
12 जूनला बैठकीला जाण्यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना वेळच नव्हता. त्यामुळे सर्व पक्षांनी आपापले प्रतिनिधी पाठवायचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय काही नितीश कुमार यांना रुचला नाही. त्यामुळे नितीश कुमार यांनी ती बैठक रद्द केली होती. आता ही बैठक 23 जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिली आहे. बैठकी संदर्भात विचार करायला प्रमुख नेत्यांना भरपूर वेळ मिळेल आणि बैठकीसाठी अजेंडा आणि मुद्दे घेऊन येण्याच्या दृष्टीने त्यांना सोयीचे होईल म्हणून 23 जून रोजी पाटण्यातच बैठक घेण्याचे सध्या ठरविले आहे, अशी माहिती त्यागी यांनी दिली आहे.
पण मूळात ही बैठक काँग्रेसच्या वाढत्या आत्मविश्वासामुळे रद्द झाली होती. पाटण्यात नितीश कुमार यांनी बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते हजर राहिले तर नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य केल्यासारखे होईल आणि ते काँग्रेसला राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकेल हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवण्याचे ठरविले होते. बाकी उद्धव ठाकरे, शरद पवार हे प्रादेशिक नेते त्या बैठकीला हजर राहणार होते. त्यामुळे ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय नितीश कुमार यांना घ्यावा लागला होता.
दरम्यानच्या काळात काँग्रेसने पाटण्याऐवजी हिमाचल प्रदेशात बैठक घेण्याची सूचना करून पाहिली. पण ती नितीश कुमार यांनी मान्य केली नाही. त्यामुळे आता 23 जून रोजीची बैठक पाटण्यातच होणार असल्याचे जरी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात बैठक होईपर्यंत विरोधकांचे ऐक्य जसेच्या तसे टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App