जगाच्या शिखरावर उभारला पूल, तब्बल १९ हजार फुटावरून जाणारा सर्वात उंचीवरील रस्ता झाला सुरू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) चमत्कार घडवित जगातील सर्वात उंचीवरून जाणारा रस्ता तयार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे बांधलेल्या २७ प्रकल्पांचे उद्घाटन केले, ज्यामध्ये २४ पूल आणि तीन रस्त्यांचा समावेश आहे. याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे.The bridge, built on the world’s highest peak, has become the highest road in the world, passing over 19,000 feet

या प्रकल्पांपैकी बहुतांश सीमावर्ती भागात आहेत. यातील एक पूल तब्बल १९ हजार फूट उंचीवर असलेल्या खिंडीतून जाणारा, आता जगातील सर्वात उंचीवरून वाहन चालवण्या योग्य रस्ता बनला आहे. चिसुमले आणि डेमचोक यांना जोडणारा हा रस्ता दक्षिण लडाखमध्ये आहे. हा उमलिंग ला नावाच्या खिंडीतून जातो. ही खिंड १९ हजार फूट उंचीवर आहे.



चिसुमले ते डेमचोक हा ५२ किमीचा ब्लॅक-टॉप डांबरी रस्ता आहे. यापूर्वी जगातील सर्वात उंचीवरील रस्ता १८ हजार ९५३ फूट उंचीवर बोलिव्हियामधील होता.लडाखमधील रस्ता अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बांधण्यात आला होता, कारण प्रदेशातील तापमान उणे ४० अंश सेल्सिअसच्या खाली येऊ शकते आणि ऑक्सिजनची पातळी सामान्यपेक्षा ५० टक्क्यांपर्यंत खाली जाते.

संरक्षण विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार किमान गेल्या चार वर्षांपासून वाहने उमलिंग ला खिंड ओलांडत आहेत. तथापि, खिंडीवरील रस्ता आता काळ्या डांबरी झाला आहे. त्यामुळे प्रवास सोपा झाला आहे .

बीआरओने उमलिंग ला मार्गे १९ हजार ३०० फूट उंचीवर हा रस्ता ब्लॅक टॉपिंग करण्यात आला होता. हा रस्ता पूर्व लडाखच्या चुमार सेक्टरमधील शहरांना जोडतो. लेहपासून चिसुमले आणि डेमचोक दरम्यान थेट मार्ग तयार झशला आहे.

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी जाणाºया बेस कॅँम्पचा र नेपाळमधील रस्ताही यापेक्षा कमी उंचीवर आहे. हा रस्ता १७ हजार ५९८ फूट उंचीवर आहे. तिबेटमधील उत्तर बेस कॅम्प १६ हजार ९०० फूट आहे.

चिसुमले-डेमचोक रस्ता सियाचीन ग्लेशियरपेक्षाही उंच आहे जी १७,७० फूटांवर आहे. लेहमधील खार्दुंग ला, जो एकेकाळी जगातील सर्वात उंच रस्त्यांपैकी एक होता तो १७ हजार ५८२ फूट उंचीवर आहे.

The bridge, built on the world’s highest peak, has become the highest road in the world, passing over 19,000 feet

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात