टीएमसी आमदाराच्या साथीदारावर हल्ला
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालच्या संदेशखळीमध्ये रविवारी पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनादरम्यान भाजप समर्थकांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. The atmosphere of tension again in Sandeshkhali in West Bengal
तृणमूल काँग्रेसचे आमदार सुकुमार महता यांचे सहकारी ततन गायन यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दंगल नियंत्रण दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
रविवारी संदेशखळीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला.
बंगालच्या उत्तर 24 परगणामधील हे ठिकाण चर्चेत आले जेव्हा तेथील रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसचे शक्तिशाली नेते शेख शाहजहान आणि त्याच्या सहकारी स्थानिक TMC नेत्यांवर जमीन हडप, खंडणी आणि लैंगिक छळाचा आरोप केला. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्याप्रकरणी टीएमसीमधून हकालपट्टी करण्यात आलेला शेख शाहजहान आता सीबीआयच्या ताब्यात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App