दहशतवाद्यांनी लष्कराच्या केले दोन जवानांचे अपहरण; एक वाचला, दुसऱ्याचा मृतदेह सापडला
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : Terrorists दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन जवानांचे अपहरण केले. यातील एक जवान दहशतवाद्यांना ( Terrorists ) चकमा देत पळून आली. तर आता एका जवानाचा मृतदेह सापडला आहे.Terrorists
जवानाच्या अंगावर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. अपहरण केलेल्या जवानाचा मृतदेह अनंतनागच्या जंगलातून सापडल्याचे सांगण्यात येत आहे. या जवानाच्या शरीरावर गोळ्या आणि चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातून प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. याशिवाय आणखी एक जवान बेपत्ता आहे. त्याला गोळी लागली, मात्र त्यानंतरही हा जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, दुसऱ्या जवानाचा मृतदेह आज म्हणजेच बुधवारी अनंतनागच्या जंगलातून सापडला आहे. कालपासून या भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली होती. यावेळी जवानाचा मृतदेह सापडला.
भारतीय लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाच्या अपहरणाची माहिती दिली होती. ज्यात म्हटले आहे की, “गुप्तचर माहितीच्या आधारे, 08 ऑक्टोबर 24 रोजी काझवान फॉरेस्ट कोकरनाग येथे भारतीय लष्करासह जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि इतर एजन्सींनी एक संयुक्त दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. ही कारवाई रात्रभर सुरू राहिली. या दरम्यान एक प्रादेशिक लष्कर सैनिक बेपत्ता झाला, त्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोधमोहीम राबवली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App