जाणून घ्या कुठं घडला आहे हा भीषण अपघात
विशेष प्रतिनिधी
हरियाणातील नारनौलमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 6 मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली असून, 12 मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना नारनौलमधील केनिना गावाजवळ घडली.Terrible accident School bus overturns six students killed many seriously injured
जीएल पब्लिक स्कूलची बस उलटल्याने अनेक मुले गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे ईदच्या शासकीय सुट्टीतही शाळा सुरू होत्या, हा मोठा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसचे फिटनेस सर्टिफिकेटही कालबाह्य झाले असून फिटनेस प्रमाणपत्राशिवाय बसमधून मुलांची वाहतूक सुरू होती.
अशीच एक घटना 2 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील देवा पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूर गावाजवळ घडली होती. लखनऊमध्ये पिकनिकनंतर परतणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटल्याने तीन मुले आणि एका कंडक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२ मुले जखमी झाली होती. अपघाताच्या वेळी स्कूल बसचा वेग खूप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. 12 ते 13 वर्षे वयोगटातील तीन मुले आणि बस कंडक्टरचाही मृत्यू झाला असून 32 मुले गंभीर जखमी आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App