विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र समूहाची 751.9 कोटीची प्रॉपर्टी मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीने जप्त केली. ही जप्ती वैध असल्याचा निर्वाळा PMLA कोर्टाने आज दिला. त्यामुळे काँग्रेस आता पुरती अडचणीत सापडली आहे. Rahul and Sonia Gandhi, holding 76% of YI shares, were previously questioned by Enforcement Directorate.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसची बँक खाती आधीच गोठवली असून त्या पाठोपाठ नॅशनल हेरॉल्ड वृत्तसमूहाची आधीच जप्त केलेली 751.9 कोटीची मालमत्ता देखील आता त्यांना परत मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.
नॅशनल हेरॉल्ड मध्ये यंग इंडिया कंपनी मार्फत मनी लॉन्ड्रीग करत पैशांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने यापूर्वीच अनेकदा चौकशी करून त्यानंतरच असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या नॅशनल हेरॉल्डची टप्प्याटप्प्याने तब्बल 751.9 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्या विरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी संचालक असलेल्या “यंग इंडिया” कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने नॅशनल हेरॉल्डची 751.9 कोटींची संपत्ती जप्त करणे वैध असल्याचा निर्वाळा दिला. यंग इंडिया कंपनीतल्या एकूण मालमत्तेच्या 76% शेअर्स सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मालकीचे आहेत.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र समूह पंडित नेहरूंनी स्थापन करून चालविला होता. त्याच्यानंतर त्याची मालकी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत गांधी परिवाराकडेच राहिली यंग इंडिया ही त्यातलीच एक कंपनी असून तिचे 76% शेअर्स सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मालकीचे आहेत. त्यांच्या या संपत्तीवर आता टांच आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App