जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात एकूण ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.Terrible accident on Yamuna Expressway 40 passengers injured in collision of two buses
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर मथुराजवळील माईल स्टोन ११० राया कट येथे पहाटे तीन वाजता दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी ३१ जखमींना जिल्हा रुग्णालयात तर ९ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी जबाब दिला
यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातावर पोलिसांचे म्हणणेही समोर आले आहे. मथुराचे एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, अपघातामधील एक बस धौलपूरहून नोएडाला जात होती आणि दुसरी बस इटावाहून नोएडाला जात होती. दरम्यान यमुना द्रुतगती मार्गावर या दोन्ही बसचा अपघात झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more