दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना ; छत कोसळल्याने सहा जण जखमी!

Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

वाहनांचेही झाले मोठे नुकसान Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी टर्मिनल १ वर विमानतळाचे छत एका वाहनावर पडले. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळले. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत सुरुवातीस चार जण जखमी झाल्याचे वृत्त होते, मात्र. आता जखमींची संख्या सहा झाली आहे.

अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याचा फोन शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता त्यांना आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आतापर्यंत तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र एक जण अडकला होता. त्याचीही आता सुटका करण्यात आली आहे.

Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात