रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या मजुरांनी लोकांना वाचवण्यासाठी अलकनंदा नदीत उडी घेतली, त्यात एकाचा मृत्यू झाला.
विशेष प्रतिनिधी
रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. रुद्रप्रयागमध्ये हायवेवरून अलकनंदा नदीत एक टेम्पो ट्रॅव्हलर उलटला. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 23 जण प्रवास करत होते. त्यापैकी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यानंतर अलकनंदा नदीच्या काठावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होताच एकच गोंधळ उडाला.Tempo traveller overturns on Alaknanda river off Badrinath Highway 10 people dead 9 injured
प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. सध्या बचावकार्य सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
जखमींना हेलिकॉप्टरद्वारे उपचार केंद्रात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तकाशीहून हेलिकॉप्टर रुद्रप्रयागला पोहोचले. यानंतर चार जखमींना हेलिकॉप्टरने एम्समध्ये नेण्यात आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या मजुरांनी लोकांना वाचवण्यासाठी अलकनंदा नदीत उडी घेतली, त्यात एकाचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App