विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात या आठवड्यात पहिल्यांदाच रात्रीचे तापमान शून्य अंशाच्या वर राहिल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. तर राजस्थानमध्येही थंडीने जोर धरायला सुरुवात केली आहे. श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री ०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.Temp. dips in Kashmir and Rajsthan
गेल्या काही दिवसात काश्मीरमधील सर्वात कमी तापमान नोंदवत असलेल्या पहलगाममध्ये उणे २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुपवाडामध्ये उणे ०.३ अंश सेल्सिअस, काझीगुंडमध्ये उणे ०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
या महिन्याअखेरपर्यंत तापमान कोरडे तसेच थंड राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तर राजस्थानातील चुरू येथे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने बुधवारी सांगितले.
हनुमानगड जिल्ह्यातील सांगारिया येथे ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातही बहुतांश भागात रात्रीचे तापमान १० ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. येत्या २४ तासांत हीच परिस्थिती कायम असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App