वृत्तसंस्था
म्हैसुरू : 3 पुस्तके लिहून जिहादी दहशतवादाची चिरफाड करणारे इंटेलिजन्स ब्युरोचे निवृत्त अधिकारी आर. एन. कुलकर्णी यांची हिट अँड रन केस मध्ये हत्या करण्यात आली आहे. म्हैसूरू विद्यापीठाच्या कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट परिसरात फिरायला निघालेल्या आर. एन. कुलकर्णी यांना नंबर प्लेट नसलेल्या एका कारणे जोरात टक्कर दिली आणि ती कार वेगाने निघून गेली, असा खुलासा सीसीटीव्ही फुटेज मधून झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ अपघाती मृत्यूची नोंद आता घातपातामध्ये बदलून सध्या अज्ञात असलेल्या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हैसूरचे पोलीस कमिशनर चंद्रगुप्त यांनी स्पष्ट केले आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली. Television Bureau Officer R. N. Kulkarni’s murder in Mysur
आर. एन. कुलकर्णी यांच्यासारख्या इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 35 वर्ष सेवा दिलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या ही अत्यंत धक्कादायक घटना असून आरोपींना पकडण्यासाठी म्हैसूरू पोलिसांच्या तीन टीम तयार केल्या असून पोलीस आरोपींचा आणि हत्येच्या कारणाचा कसून शोध घेत आहेत.
आर. एन. कुलकर्णी 4 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास फिरायला बाहेर पडले होते. समोरून कार येत आहे हे पाहून ते रस्त्याच्या कडेला गेले. परंतु आरोपींनी कार वळवून त्यांना जोरात टक्कर दिली ते अक्षरशः उडून पडले आणि नंतर कार पळून गेली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा खुलासा झाला आहे. कुलकर्णी यांना काही लोकांनी ताबडतोब स्थानिक रुग्णालयात दाखल केले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
आर. एन. कुलकर्णी यांच्या हत्येमागे काही वैयक्तिक दुश्मनी आहे किंवा अन्य काही कारणे आहेत का?, याचा तपास पोलीस करत आहे घराची दुरुस्ती करण्याच्या मुद्द्यावर कुलकर्णी यांचे शेजाऱ्यांची वाद असल्याचे सांगितले जाते.
– आर. एन. कुलकर्णी यांची कारकीर्द
आर एन कुलकर्णी यांचे वय 83 होते ते 23 वर्षांपूर्वीच इंटेलिजन्स ब्युरो मधून निवृत्त झाले होते. त्यांनी काही काळ रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात रॉ मध्ये देखील काम केले होते.
कुलकर्णी यांनी जिहादी दहशतवादाची चिरफाड करणारे पुस्तक ‘फैक्ट ऑफ टेररिजम इन इंडिया’ यासह तीन पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App