प्रतिनिधी
पुणे : टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2020 मध्ये निधन झाले होते. रायकर यांच्या निधनानंतर काही दिवसांत केंद्र सरकारने 5 लाखांची मदत रायकर यांच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर राज्य भाजप कडूनही 5 लाखाची मदत मिळाली. TV 9 journalist Kai. Pandurang Raikar’s family still waiting for help announced by Supriya Sule
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रायकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
परंतु, आता या घटनेला अडीच वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप रायकर कुटुंबीयांना ही मदत मिळालेली नाही. या संदर्भात पांडुरंग रायकर यांची पत्नी शितल रायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले असून सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेली मदत अद्याप मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच यामध्ये या मदतीच्या अजूनही प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पत्रात शितल रायकर यांनी आपल्या दोन्ही मुलांचे बँक अकाउंट नंबर दिले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली मदत जमा करण्याची विनंती केली आहे. या पत्राच्या प्रती शितल रायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठविल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App