तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे. केसीआरवर टीका करताना भाजपने म्हटले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री गद्दार असल्यासारखे बोलत आहेत.
वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे. केसीआरवर टीका करताना भाजपने म्हटले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री गद्दार असल्यासारखे बोलत आहेत.
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय म्हणाले की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भारतीय सैन्याला कमकुवत करण्यासाठी देशद्रोही असल्यासारखे बोलत आहेत. तुमच्यासारखा देशद्रोही जो पाकिस्तान आणि चीनचा एजंट आहे त्याची तेलंगणाच्या भूमीवर राहण्याची लायकी नाही. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे लोक संतप्त झाले आहेत, त्यांचे रक्त खवळले आहे.
‘केसीआर काँग्रेसची स्क्रिप्ट वाचतात’
काल मुख्यमंत्री केसीआर यांनी भारतीय लष्कराचा अपमान केल्याने संपूर्ण भारताला लाज वाटत असल्याचे भाजप नेते म्हणाले. बंदी संजय म्हणाले की, तुम्ही काँग्रेसवाल्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहात. के चंद्रशेखर राव यांनी रविवारी सांगितले होते की, मी अजूनही पुरावे मागत आहे. भारत सरकारला पुरावे दाखवू द्या भाजप खोटा प्रचार करत आहे म्हणून आम्ही पुरावे मागत आहोत.
भाजपवर टीका करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की ते लोकशाहीत राजासारखे वागत आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथील बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सर्जिकल स्ट्राईक केले. दरम्यान, सोमवारी भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याची तिसरा स्मृतिदिन पाळला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या या हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App