मध्य प्रदेश, राजस्थान मधल्या दुःखावर तेलंगणात फुंकर; प्रादेशिक बीआरएसला हरवून काँग्रेस सत्तेवर!!

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : राजस्थानातील सत्ता गमावली. मध्य प्रदेशात भाजप कडून सत्ता खेचून घेता आली नाही. या दोन राज्यांमधल्या दुःखावर तेलंगणातून फुंकर आली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षावर मात करून काँग्रेसने तेलंगण प्रदेश जिंकला आहे. त्यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व दक्षिणेत झळाळून उठले आहे.Telangana blows over misery in Madhya Pradesh, Rajasthan; Congress to power after defeating regional BRS!!

काँग्रेसच्या ऐतिहासिक राजकीय परंपरेनुसार मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमधला पराभव हा तिथल्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा झाला आहे. काँग्रेस मधला अंतर्गत वाद या नेत्यांना भोवला आहे. पण तेलंगणातल्या विजयाचे श्रेय मात्र काँग्रेसच्या बहीण भावांना आहे. कारण या बहीण भावांनी आपली राजकीय बाजीपणाला लावून तेलंगणात काँग्रेससाठी विजय खेचून आणला आहे.



तेलंगणात काँग्रेसने कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे जरी आघाडीचे प्रचारक असले तरी त्यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले नव्हते. त्याउलट राहुल गांधींच्या चेहऱ्यावर काँग्रेसने निवडणूक लढविली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापेक्षा राहुल गांधींची पोस्टर्स संपूर्ण तेलंगणभर झळकत होती.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती पुन्हा निवडून आल्यास आपल्या मुलाच्या केटी रामाराव यांच्या हातात तेलंगणाची कमान सोपवून आपण राष्ट्रीय राजकारणात झेप घ्यायची, ही चंद्रशेखर राव यांची महत्त्वाकांक्षा होती. पण काँग्रेसचे सुपरस्टार प्रचारक राहुल गांधींनी प्रादेशिक नेते असलेल्या चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा धुळीस मिळवली.

  • * राहुल गांधींमुळे तेलंगणात काँग्रेसचा विजय झाला. मध्य प्रदेश आणि राजस्थानात मात्र काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व हरले. अर्थात हा काँग्रेसचा “ऐतिहासिक सिद्धांत” आहे. पराभवाचे खापर स्थानिक नेतृत्वावर आणि विजयाचा मुकुट गांधी परिवाराच्या मस्तकावर!!, हा तो ऐतिहासिक सिद्धांत आहे!!*

तेलंगणा मधल्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेसने प्रादेशिक पक्षांवर कुरघोडी केल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांना आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपशी टक्कर घेणे भाग पडणार आहे.

Telangana blows over misery in Madhya Pradesh, Rajasthan; Congress to power after defeating regional BRS!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात