कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना कोमजले!!


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वात धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागत आहेत. तिचे कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना छिंदवाड्यात कोमेजले आहे. आपल्या बालेकिल्ल्यात छिंदवाडा मतदारसंघात कमलनाथ पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात ताज्या आकडेवारीनुसार भाजप 138, तर काँग्रेसचे 80 जागांवर आघाडीवर आहे.Kamalnath losing in chindwada, madhya Pradeshयाचा अर्थ शिवराज मामांना त्यांची लाडकी बहीण पावली आहे. पण महाराजांबरोबर म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर घेतलेला पंगा आणि दिग्गीराजांबरोबर चालू ठेवलेले राजकीय वैर कमलनाथ यांना कारकीर्दीच्या अखेरीस फारच महागात पडलेले दिसत आहे. छिंदवाडा हा बालेकिल्ला हातातून निसटताना दिसत आहे. आपला मुलगा नकुलनाथ याचे पॉलिटिकल करिअर सेट करण्याच्या नादात हे घडल्याचे बोलले जात आहे.

Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज

त्या उलट भाजपने योग्य वेळेला भाकऱ्या फिरवल्या 3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन रणमैदानात उतरवले. या बदललेल्या स्ट्रॅटेजीचा भाजपला फायदा झाला. “अँटी इन्कमबन्सी” फॅक्टर भाजप सरकारपुढे चालू शकला नाही. सातत्याने काम करणारा नेता म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रतिमा भाजपच्या कामी आली आणि शिवराज मामा + महाराजा अर्थात ज्योतिरादित्य सिंधिया हे पॉलिटिकल कॉम्बिनेशन म्हणजेच बेरजेचे राजकारण भाजपला यश देऊन गेले.

आता शिवराज सिंह यांना सन्मानाने केंद्रात मोठे पद देऊन मध्य प्रदेशात नव्या पिढीचा मुख्यमंत्री करणे भाजपला शक्य होणार आहे. मध्य प्रदेशात भाकरी फिरण्याची दाट शक्यता आहे.

Kamalnath losing in chindwada, madhya Pradesh

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*