वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका व्हिडिओत छेडछाडीच्या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे ५ नेते अडचणीत सापडले आहेत. दिल्ली पोलिसांनी रेवंत यांना १ मे रोजी दिल्लीला बोलावले आहे. त्यांना आपला फोन सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे. पाच नेत्यांमध्ये तेलंगणा काँग्रेस अध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांच्यावर व्हिडिओ वितरणाचा आरोप आहे. संपादित केलेल्या व्हिडिओमध्ये शाह आरक्षण संपुष्टात आणू असे म्हणत असल्याचे दाखवले आहे. या प्रकरणी भाजप व सायबर गुन्हे समन्वय केंद्राने स्वतंत्र एफआयआर दाखल केले. ईडीनंतर मोदी जिंकण्यासाठी पोलिस वापरत आहेत, असा आरोप रेड्डींनी केला.Tampering with Amit Shah’s video: Telangana CM summoned, two FIRs filed in Delhi
आसाममधून १ अटकेत
आसामचे सीएम हिमंता बिस्वा सरमा सोमवारी म्हणाले, या प्रकरणी गुवाहाटीतून रितम सिंग यास अटक करण्यात आली आहे. त्याचे दोन मोबाइल व खासगी लॅपटॉपदेखील जप्त केले आहेत. रितम काँग्रेस वॉररूमशी संबंधित सांगितले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more