विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात आज (शनिवार) सकाळी ही घटना घडलीय. दरम्यान या आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत.Tamil Nadu: Fire kills 3 at firecracker factory near Virudhunagar district; 3 killed; 5 injured
विशेष प्रतिनिधी
तामिळनाडू : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्याजवळ RKVM फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागलीय.या आगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.दुर्घटनेनंतर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.जिल्हाधिकारी मेघनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिलीय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॅक्टरीत अचानक झालेल्या स्फोटानंतर ही आग लागली.
विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात आज (शनिवार) सकाळी ही घटना घडलीय. दरम्यान या आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे.
या दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी शिवकाशी येथील शासकीय रुग्णालयात सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल करण्यात आलंय.दुर्घटनेची माहिती साजताच वरिष्ठ महसूल आणि पोलिस अधिकारी कारखान्यात पोहोचले आहेत.सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App