नियंत्रण रेषेवरील (LOC) विविध ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली.HAPPY NEW YEAR: India-Pak soldiers wish each other sweets on New Year
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवीन वर्ष हा जगभरातील साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि आपण तो पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो कारण आपला विश्वास आहे की प्रत्येक दिवस मागील दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे.दरम्यान भारत पाकिस्तान सीमेवर सैनिकांनी एकमेकांना मिठाई देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी पुलवामा हल्यानंतर तब्बल तीन वर्षांच्या काळानंतर दिवाळीच्या वेळी भारत-पाकिस्तान सैनिकांनी सीमेवर एकमेकांना मिठाईचं वाटप केलं होते. नियंत्रण रेषेवरील (LOC) विविध ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली.भारत पाक सैनिकांनी सीमेवर एकमेकांना मिठाई देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच मेंढर हॉट स्प्रिंग क्रॉसिंग येथे भारत पाकिस्तानच्या सैनिकांनी नववर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.पुढे पूंछ रावलाकोट क्रॉसिंग पीटी येथेही भारत-पाक जवानांनी एकमेकांना मिठाई देऊ केली.चकोटी उरी क्रॉसिंग पीटी येथे भारत आणि पाकिस्तान सैनिकांनी देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App