तालिबानने नवनवे फर्मान काढत महिलांवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. रविवारी काढलेल्या फर्मानमध्ये देशातील टीव्ही वाहिन्यांना महिला अभिनेत्री काम करत असलेल्या टीव्ही मालिका बंद करण्यास सांगितले आहे. तालिबानच्या नैतिकता आणि गैरवर्तन निर्मूलन मंत्रालयाने अफगाण मीडियाला असा पहिला आदेश जारी केला आहे. Taliban tightens restrictions on women, bans female actors from TV channels, hijabs for female anchors
वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने नवनवे फर्मान काढत महिलांवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. रविवारी काढलेल्या फर्मानमध्ये देशातील टीव्ही वाहिन्यांना महिला अभिनेत्री काम करत असलेल्या टीव्ही मालिका बंद करण्यास सांगितले आहे. तालिबानच्या नैतिकता आणि गैरवर्तन निर्मूलन मंत्रालयाने अफगाण मीडियाला असा पहिला आदेश जारी केला आहे.
यासोबतच तालिबानने वृत्तवाहिन्यांवरील महिला अँकर्सना बातम्या सादर करताना हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. प्रेषित मुहम्मद किंवा इतर श्रद्धास्थानांबद्दल काहीही दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम प्रसारित करू नयेत, असे बजावण्यात आले आहे. इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्यास सांगण्यात आले आहे.
तालिबानचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत.” रविवारी संध्याकाळी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली. तालिबानने दोहा करारात आश्वासन दिले होते की ते पूर्वीसारखे राज्य करणार नाहीत आणि खुल्या मनाने वागतील. पण तरीही ते नियम लागू करू लागले असून स्त्रियांनी काय परिधान करावे आणि काय नाही, हे ठरवण्यास सुरुवात केली आहे.
तालिबानने माध्यमांना स्वातंत्र्याचे आश्वासन दिले होते, परंतु अफगाणिस्तानात अनेक पत्रकारांवर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला. येथे त्यांची सत्ता 20 वर्षांनी पुन्हा आली. तालिबानच्या पुन्हा ताब्यात गेल्यानंतर मात्र येथील माध्यमांवरही बंधने लादण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App