अयोध्या – काशी – मथुरा; श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान मोदींनी वाजविला पुढच्या कामाचा डंका!!

विशेष प्रतिनिधी

मथुरा : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरा श्रीराम लालांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधून तयार झाला आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या महत्त्वपूर्ण कामाचा डंका वाजविला आहे. Taking darshan of Sri Krishna Janmabhoomi, Prime Minister Modi played the next work

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी येथे जाऊन गोपाळ कृष्णाचे दर्शन घेतले. श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले. या आधी एकाही पंतप्रधानाने श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट दिलेली नाही. श्रीकृष्ण जन्मभूमी कॉरिडॉर बांधण्याचा मार्ग अलाहाबाद हायकोर्टाने मोकळा करून दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथे भेट देणे याला विशेष महत्त्व आहे.

अयोध्येमध्ये राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम लालांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे यासाठी जानेवारी महिन्यात संपूर्ण देशभर भव्य दिव्य कार्यक्रमांसह पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे.

पंतप्रधान मोदींचेच लोकसभा कार्यक्षेत्र असलेले काशी क्षेत्र नव्या कॉरिडॉरसह सज्ज झाले आहे. तिथल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद देखील कोर्टात अंतिम टप्प्यात आला आहे. त्या पाठोपाठ श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती हा विषय देखील भाजप सह सर्व हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराकडे जाणारा रस्ता खूप अरुंद आहे. त्याचे विस्तारीकरण करून श्रीकृष्ण जन्मभूमी कॉरिडॉर बांधण्याचा उत्तर प्रदेश मधल्या योगी आदित्यनाथ सरकारचा इरादा आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्याविषयी अनुकूल निर्णय देऊन श्रीकृष्ण जन्मभूमी कॉरिडॉर उभारण्याचा मार्ग खुला करून दिला आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीकृष्ण जन्मभूमी येथे जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेणे याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती लढ्याला कायदेशीर पातळीवर बळ देणे हे देखील पंतप्रधान मोदींच्या भेटीतून साध्य झाले आहे.

Taking darshan of Sri Krishna Janmabhoomi, Prime Minister Modi played the next work

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात