विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक दहा दिवस सुट्टी मिळाली तर त्याला आश्चर्याचा धक्का निश्चितच बसेल. आता संवेदनशिल पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना हा धक्का बसणार आहे. खुद्द रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियानेच बॅँकांना हे आदेश दिले आहेत.Surprise the employees by giving a sudden ten days leave, Reserve Bank orders the banks, the work of those working in sensitive positions
मात्र, या दहा दिवसांच्या काळात कर्मचाऱ्यांचे काम दुसऱ्याला करावे लागणार असल्याने काही गैरप्रकार असल्यास उघड होईल, अशी रिझर्व्ह बॅँकेची भूमिका आहे.रिझर्व्ह बॅँकेने या संदर्भात बॅकांना पत्र पाठविले आहे. प्रत्येक बॅँकेत अनिवार्य रजा धोरण असणे गरजेचे आहे.
प्रामुख्याने संवेदनशिल पदांवर काम करणाऱ्यांसाठी हे धोरण असणार आहे. विशेष म्हणजे एका टप्यात मिळणाऱ्या दहा दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीची कोणतीही पूर्वकल्पना या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.
हे कर्मचारी सक्तीच्या सुट्टीवर असताना बॅँकेच्या ई-मेलशिवाय कोणत्याही प्रकारे त्यांना बॅँकेशी संपर्क साधता येणार नाही. त्यांना बॅँकेतील दैनंदिन कामात किंवा ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळणार नाही. सर्व बॅँकांनी आपल्याकडील संवेदनशिल पदांची यादी तयार करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत बॅँकेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. पंजाब नॅशनल बॅँक असो की सहकारी बॅँका यांच्यात झालेले घोटाळे कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाले आहेत. प्रामुख्याने महत्वाच्या आणि संवेदनशिल पदांवर काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांकडून हे प्रकार घडले आहेत.
त्यामुळे या पदांवर काम करणारे कर्मचारी सुट्टीवर गेले तर त्यांच्या कामाची जबाबदारी इतर कोणावर सोपविली जाईल. त्यामुळे काही गैरप्रकार होत असेल तर उघह होईल, असा रिझर्व्ह बॅँकेचा यामागचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App