दादाला गळाला लावण्याची ममतांची खेळी, सौरभ गांगुली तृणमूलकडून राज्यसभेवर जाणार


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : कोलकाता: भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होऊ नये यासाठी ममता बॅनर्जी देव पाण्यात घालून बसल्या होत्या. आता दादालाच गळाला लावण्याची खेळी ममता खेळत आहे. तृणमूल कॉँग्रेसकडून सौरभ गांगुलीला राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा सुरू आहे.Mamata’s play, Saurabh Ganguly to go to Rajya Sabha from Trinamool

गेल्या काही काळापासून गांगुलीला भाजपमध्ये आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध गांगुलीला उभे करण्याचा प्रयत्न केला होता.



पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांनी त्याची भेटही घेतली होती. दादा भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार झाला तर आपली काय धडगत नाही याची ममता बॅनर्जी यांना पूर्ण कल्पना होती.

परंतु, ह्रदयविकाराचा झटका आल्याने दादाने राजकारणात प्रवेश केला नाही. पण तेव्हा गांगुलीने राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले होते.

दिनेश त्रिवेदी यांनी टीएमसी सोडल्याने आणि राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने तसेच मानस भुइना यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या चर्चेवर अद्याप तृणमूलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मात्र जर गांगुली राज्यसभेचे सदस्य झाले तर आम्हाला काहीच आक्षेप असू शकत नाही असे म्हटले आहे.८ जुलै रोजी दादाने ४९वा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या.

या भेटीनंतर गांगुली तृणमूलकडून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर पकडला आहे. ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली यांचे खुप चांगले संबंध आहेत. सौरवला बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष करण्यात ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने या पदाचा राजीनामा दिला होता. जानेवारी महिन्यात जेव्हा सौरव गांगुलीला हद्य विकाराचा धक्का बसला होता तेव्हा ममतांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की टीएमसीकडून गांगुलीला राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

Mamata’s play, Saurabh Ganguly to go to Rajya Sabha from Trinamool

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात