प्रतिनिधी/ वृत्तसंस्था
मुंबई / श्रीनगर : महाराष्ट्र आणि देशात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने उसळलेल्या राजकीय वादात एक वेगळीच बातमी आली आहे. त्यामुळेच शीर्षकात विचारलेला प्रश्न विचारावा लागतो आहे. यू टर्न घेताय कोण??, सुप्रिया सुळे आणि फारुख अब्दुल्ला पण!!, हे त्याचे उत्तर आहे. Supriya Sule and Farookh Abdullah parise Modi government and hindu dharma respectively
कारण काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष केंद्रातल्या मोदी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकारला घेरत असताना खासदार सुप्रिया सुळे आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. किंबहुना तो सूर केंद्रातील मोदी सरकारला अनुकूल असल्याचे दिसत आहे. पिंपरीतील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आवडते पंतप्रधान आहेत. त्यांनी काही चांगली कामे केली आहेत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रशंसा केली, तर दुसरीकडे जम्मू काश्मीर मधील अखनूर जिल्ह्यात एका जाहीर सभेत डॉ. फारूख अब्दुल्लांनी कोणताही धर्म वाईट नसतो. भगवान श्रीराम फक्त हिंदूंचे नाहीत. ते आपल्या सर्वांचे आहेत, असे वक्तव्य केले.
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर स्तुतिसुमने उधळतानाच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची ही स्तुती केली. आम्ही दोघेही एकाच विचारांचे आहोत, अशी पुस्तीही त्याला जोडली. पण त्याच वेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्यावर मात्र टीका केली. शिवछत्रपतींचा अपमान आणि सहन करणार नाही. राज्यपाला विरुद्ध प्रोटोकॉल मुळे बोलता येत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
तर डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी भगवान श्रीराम सर्वांचे आहेत, असे वक्तव्य करून भाजपवर मात्र शरसंधान साधले. भाजप देशातल्या विविध धर्मीयांमध्ये आपल्या राजकारणासाठी फूट पाडतो आहे. देशात बेरोजगारी वाढत असताना त्यावर उपाय करण्याऐवजी धार्मिक मुद्द्यांना हवा देतो आहे, असा आरोप त्यांनी केला.
पण एकूण सुप्रिया सुळे आणि डॉ. फारूख अब्दुल्ला या दोन्ही नेत्यांचा सूर मात्र सध्या सर्व विरोधी पक्ष काढत असलेल्या सुराच्या विरोधीच दिसला. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने दररोज केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडत आहेत. सावरकरांविषयी त्यांनी अवमानास्पद व्यक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि फारूक अब्दुल्ला यांची वक्तव्य मात्र यू-टर्न घेतल्यासारखेच दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य करताना त्यांच्या नावातच यू-टर्न आहे, अशी टिपण्णी केली होती. पण आता मात्र नावात कोणताही यू-टर्न नसताना सुप्रिया सुळे आणि फारूक अब्दुल्लांनी केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी स्तुती करण्याचा यू-टर्न घेतल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App