जाणून घ्या, पूर्ण निर्णय कधी येईल?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : NEET पेपर लीकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यास सांगितले. निकाल ऑनलाइन आणि केंद्रनिहाय जाहीर केला जाईल. शहर आणि केंद्रानुसार निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.Supreme Courts order on NEET NTA released and declared it online
तसेच विद्यार्थ्यांची ओळख लपवून ठेवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी एनटीएला शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सीजेआय म्हणाले की पटनामध्ये परीक्षेपूर्वी पेपरफुटी झाली होती यात शंका नाही. याआधी न्यायालयाने सरकार, एनटीए आणि उमेदवारांना प्रश्न विचारले. परीक्षा रद्द होऊ शकते म्हणून इतका मोठा गोंधळ झाला आहे का हे जाणून घ्यायचे होते.
सुप्रीम कोर्ट सोमवार, 22 जुलै रोजी NEET वर पुढील आणि अंतिम सुनावणी घेणार आहे. CJI म्हणाले की, सुनावणी 10:30 वाजता सुरू होईल, जेणेकरून दुपारपर्यंत खटला निकाली काढता येईल. सॉलिसिटर जनरल म्हणाले की, 24 जुलैपासून समुपदेशन सुरू होईल. आम्हाला ही माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणायची आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App