वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात अटक असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाबाबत आशेचा किरण दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील युक्तिवादावर सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ईडीला सांगितले.Supreme Court to consider Kejriwal’s bail Court notice to ED, hearing on May 7
न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ईडीतर्फे उपस्थित अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांना सांगितले की, केजरीवाल यांच्या अटकेविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतरिम जामीन देण्याबाबत न्यायालय ईडीची बाजू ऐकून घेण्याचा विचार करत आहे. त्यावर राजू यांनी जामीन देण्यास विरोध करणार असल्याचे सांगितले. खंडपीठ म्हणाले, ‘अंतरिम जामिनावर सुनावणी घेऊ, असे आम्ही म्हणत आहोत. अंतरिम जामीन देणार असे म्हणत नाही. केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. केजरीवाल 21 मार्च रोजी अटक झाल्यापासून तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App