कोर्टाने विचारले- ही याचिका दाखल करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court देशात निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. यासंबंधीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वास्तविक, जनहित याचिकेत देशात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. ही जनहित याचिका डॉ केए पॉल यांनी दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, ही याचिका दाखल करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?Supreme Court
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जात नाही. निवडणुका हरल्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते.
बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याव्यतिरिक्त अनेक सूचना याचिकेत मागण्यात आल्या होत्या. निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे, दारू किंवा इतर प्रलोभन दिल्याबद्दल दोषी आढळल्यास निवडणूक आयोगाने किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे निर्देश देणे समाविष्ट आहे.
याचिकाकर्ते केए पॉल यांनी आपण जनहित याचिका दाखल केल्याचे सांगितले तेव्हा खंडपीठाने म्हटले, ‘तुमच्याकडे मनोरंजक जनहित याचिका आहेत. एवढ्या छान कल्पना तुम्हाला कुठून मिळाल्या?’ यावर याचिकाकर्त्याने सांगितले की, ते एका संस्थेचे अध्यक्ष आहेत. ज्याने तीन लाखांहून अधिक अनाथ आणि 40 लाख विधवांना वाचवले आहे. त्यावर खंडपीठ म्हणाले, तुम्ही या राजकीय आखाड्यात का येत आहात? तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App