विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ७४ जणांचा या पदकांनी सन्मान केला जाणार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) सुनील दत्तात्रेय काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले आहे.Sunil Kale of CRPF gets Presidents medal
२५ जणांना पोलिस शौर्यपदके, तीन जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येतील. यंदा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदके, ६२८ जणांना पोलिस शौर्यपदके, ८८ जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर ६६२ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली.
उत्कृष्ट सेवेबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांनी महाराष्ट्रातील गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक आशुतोष डुंबरे, ओझर विमानतळ सुरक्षेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे आणि यवतमाळ येथील पोलिस उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांचा गौरव करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App