विशेष प्रतिनिधी
सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. गोगामेडी खून प्रकरणी त्यांच्या पत्नीने श्यामनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.Sukhdev Singh Gogamedi murder case registered Ashok Gehlot and DGP also mentioned in FIR
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की सुखदेव सिंह गोगामेडी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांच्याकडे सुरक्षा मागितली होती, परंतु जाणूनबुजून सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही.
याप्रकरणी श्याम नगर पोलिस ठाण्यात सुखदेव सिंग हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव सिंह यांच्या पत्नी शीला यांनी ही तक्रार दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांचाही उल्लेख आहे. इतकेच नाही तर तत्कालीन अशोक गेहलोत आणि डीजीपी यांच्याकडे सुखदेव यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती, मात्र जबाबदार लोकांकडून जाणूनबुजून सुरक्षा पुरवण्यात आली नाही, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एफआयआरमध्ये सुखदेव सिंह यांच्या पत्नीने म्हटले आहे की, त्यांच्या पतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका होता. हे लक्षात घेऊन माझ्या पतीने 24 फेब्रुवारी 2023 आणि 25 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलिस महासंचालकांसह उच्च अधिकाऱ्यांना पत्रे लिहिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App