कटक स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये लागली आग


  • रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी

विशेष प्रतिनिधी

ओडिशा: कटक रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याचे वृत्त आहे. गुरुवारी सकाळी स्टेशनवर ट्रेनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चांगली बाब म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.Fire broke out in Bhubaneswar Howrah Janshatabdi Express at Cuttack stationमिळालेल्या माहितीनुसार, हावडा जनशताब्दी एक्स्प्रेस ट्रेनच्या ब्रेक शूमधून धूर निघाल्यानंतर आगीच्या ज्वाला दिसल्या. याबाबत माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रेनला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire broke out in Bhubaneswar Howrah Janshatabdi Express at Cuttack station

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*