Sudhanshu Trivedis : ‘न्यायालयाचा रोष टाळण्यासाठीच सिद्धरामय्या अन् खर्गेंनी जमीन परत केली’

Sudhanshu Trivedis

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा काँग्रेसवर हल्लोबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Sudhanshu Trivedis कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुलाने कौटुंबिक ट्रस्टला दिलेली जमीन परत केल्यानंतर, भाजपने याला अपराधीपणाची कबुली म्हणत ​​काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.Sudhanshu Trivedis

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी ( Sudhanshu Trivedis )  म्हणाले की, न्यायालयाचा रोष टाळण्यासाठीच जमीन परत केली आहे. जमीन परत केल्याने होणारे गुन्हे थांबत नाहीत. सिद्धरामय्या आणि खर्गे यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.



सुधांशू त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ विहार ट्रस्टला दिलेली जमीन परत करण्याची ऑफर देऊन खर्गे यांनी ही जमीन सत्तेचा गैरवापर करून हडप केल्याचे मान्य केले आहे. तसेच लोकायुक्त पोलीस आणि ईडीने तपास सुरू केल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या पत्नीने मुडा जमीन परत केली होती.

त्रिवेदी म्हणाले की, हे प्रकरण केवळ सिद्धरामय्या आणि खर्गे यांच्यापुरते मर्यादित नाही. नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर आहेत. अशोक गेहलोत, डीके शिवकुमार, भूपेश बघेल आणि कमलनाथ यांच्यावरही असेच आरोप आहेत.

त्रिवेदींच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींचे प्रेमाचे दुकान हे वास्तवात भूमाफियांचे अवैध दुकान आहे, ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या जमिनी हडप केल्या जातात. काँग्रेस ज्या राज्यात सरकार स्थापन करते, त्यांच्या नेत्यांची नावे जमिनीच्या वादाशी जोडली जातात.

Sudhanshu Trivedis criticism of Siddaramaiah and Kharge

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub