विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात दुसºयांदा मुख्यमंत्रीपद मिळवून योगी आदित्यनाथ यांनी विक्रम केला आहे. दुसरा विक्रमही त्यांच्या नावावर झाला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या ४४ वर्षांपासूनचे मिथक त्यांनी संपविले आहे.Such a record of Yogi Adityanath, ended the myth about Noida in Uttar Pradesh politics
दिल्लीजवळील नोएडा हे प्रगतीचे केंद्र आहे. उत्तर प्रदेशातील जीडीपीचा मोठा भाग त्यातून येतो. मात्र, येथील राजकारणात एक मिथक आहे. नोएडाला भेट दिल्यावर येथील मुख्यमंत्र्याचा पराभव होता. परंतु, योगी आदित्यनाथांनी या भंपकपणावर विश्वास ठेवला नाही. आपल्या कार्यकाळात योगींनी किमान २० वेळा नोएडाचा दौरा केला.
अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात हा समज राहिला आहे. १९८८ मध्ये काँग्रेसचे वीर बहादूर सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. ते नोएडा दौऱ्यावर गेले. त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर १९८९ साली एन. डी. तिवारी नोएडामधील सेक्टर १२ मध्ये नेहरु पार्कच्या उद्घाटनाला गेले आणि काही दिवसांत त्यांचं मुख्यमंत्री पद गेले.
नंतर कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आणि हा विश्वास अधिक दृढ झाला. कल्याण सिंह यांची खुर्ची गेल्यानंतर राजनाथ सिंह हे भाजपाचे मुख्यमंत्री झाले. २००० साली राजनाथ यांना नोएडाला जाण्याची संधी होती. मात्र ते नोएडाला गेले नाही. डीएनडी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी राजनाथ सिंह हे नोएडाला न येता दिल्लीमधूनच त्यांनी उद्घाटन केलं. मात्र नंतर त्यांचीही खुर्ची गेली.
त्यानंतर २०११ मध्ये मायावती नोएडाला आल्या आणि २०१२ मध्ये त्यांची सत्ता गेली.नंतर मुख्यमंत्री झालेले अखिलेश यादव कधी नोएडाला आले नाहीत. एकदा तर नोएडामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या परिषदेला हजर होते.
मात्र, तरीही मुख्यमंत्री या नात्याने अखिलेश यादव या परिषदेला नोएडाच्या याच भीतीमुळे हजर राहिले नाहीत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मात्र अनेकदा नोएडाला आले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांची उद्घाटनं आणि राजकीय कारणांसाठी मागील पाच वर्षात योगींनी अनेकदा नोएडाचा दौरा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App