विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच आणखी एक हिरोचे नाव समोर आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री जी किशन रेड्डी हे ते नाव आहे.Along with Devendra Fadnavis, another hero of Goa elections, G. Kishan Reddy
भाजपसमोरील अनेक अडचणी दूर करत भाजपला सत्तेत बसवण्यात जी किशन रेड्डी यांचा महत्वाचा वाटा आहे. गोव्यात भाजपला तीन अपक्षांनी तर एमजीपीनेही पाठिंबा पाठिंबा दिला आहे. रेड्डी यांनी एन्टी इन्कबन्सी फॅक्टर दूर करण्यासाठी आखलेली रणनिती आणि 33 टक्के वोट शेअर कायम राखल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला.
गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी किशन रेड्डी यांनी गोव्यात रणनिती आखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी यांची संपूर्ण रणनिती ही 67 टक्के विरोधी मतांवर आधारित होती. खरं तर गोव्यातील निवडणूक बहुरंगी बनली होती. कारण टीएमसी, आप यांच्यासह स्थानिक पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही गोव्याचा निवडणुकीत उडी घेतली होती.
गोव्यात मतांची विभागणी, कमकुवत संघटन आणि उमेदवार निवडीतील चुका यामुळे काँग्रेस सत्तेपासून दूर गेली. दक्षिण गोव्यातील मतदारांनी काँग्रेसला पर्याय म्हणून टीएमसी आणि आपच्या बाजूनं कौल दिल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, हे ओळखण्यात जी किशन रेड्डी यशस्वी ठरले.
देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी हे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत एक एक जागेचं महत्व ओळखून उमेदवार निवड आणि निवडणूक प्रचारातील चुका टाळत भाजपला विजय मिळवून दिला आहे.जी किशन रेड्डी हे तेलंगणाच्या निर्मितीनंतर पहिले कॅबिनेट मंत्री बनले आहेत.
2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारमध्ये गृह राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्राचा विकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपकडून रेड्डी यांची संघटन क्षमता आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची हातोटी यामुळे गोव्यात सहप्रभारी म्हणून नेमणूक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more