विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू -काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्यांना आता यापुढे पासपोर्ट देण्यात येणार नाही. तसेच अशा लोकांना सरकारी नोकरीसाठी अर्जही करता येणार नाही. राज्य सरकारने याबाबतचा आदेश आज जारी केला. Stone platters will didn’t get govt. job
जम्मू- काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की , सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करताना जर कोणी पकडला गेला, तर त्याच्या विरुद्धचे डिजिटल पुरावेही गोळ करण्यात यावेत. पासपोर्ट किंवा सरकारी नोकरी, योजना देताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून घ्या. दगडफेक आणि हिंसक कृत्यात सहभागी असलेल्यांचे रेकॉर्ड तपासा.
यासाठी डिजिटल पुरावे म्हणजेच सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची तपासणी करा. कोणत्याही हिंसक कृत्यात सहभागी असल्याचे आढळल्यास त्याचा पासपोर्टसाठीचा अर्ज मंजूर करू नका. सरकारी नोकरीसाठी सीआयडीचा अहवाल केंद्र सरकारने अगोदरच आवश्यक केला आहे. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याचीही माहिती देणे गरजेचे आहे. जमाते इस्लामी सारख्या कोणत्याही परदेशी संघटनेशी संपर्क असेल, तर त्याची माहिती द्यावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App