Karnataka : कर्नाटकच्या मंड्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; तलवारी आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला; 15 पोलीस जखमी

Karnataka

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकातील ( Karnataka  ) मंड्या येथील नागमंगला येथे बुधवारी रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. ही घटना रात्री आठ वाजता घडली. म्हैसूर रोडवरील दर्गाजवळ पोहोचल्यावर काही लोकांनी दगडफेक केली. यानंतर हिंदूंनी निदर्शनेही केली. परिसरातील काही दुकाने आणि तेथे उभी असलेली वाहने जाळण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

कन्नड वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मिरवणुकीवर दगडांशिवाय तलवारी, रॉड आणि ज्यूसच्या बाटल्यांनीही हल्ला करण्यात आला. त्यामुळे 15 पोलीसही जखमी झाले आहेत.



28 जणांना ताब्यात घेतले, कलम 163 लागू

कारवाईची मागणी करत हिंदू समाजाच्या लोकांनी गणेशमूर्ती रोखून धरल्या. गेल्या वर्षीही बदरीकोप्पल येथील म्हैसूर रोडवरील याच दर्ग्यासमोर गोंधळ झाला होता.

BNS चे कलम 163 (ते CrPC मधील कलम 144 होते) 3 दिवसांसाठी परिसरात लागू करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी बंद पुकारला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 28 जणांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले. त्यांची चौकशी करत आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी आज नागमंगला येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Stone pelting at Ganesh immersion procession in Mandya, Karnataka

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात