विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली इस्लामी जिहादी संघटनांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर जरी नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस ( Mohammed yunus ) यांना सरकार प्रमुख नेमले असले, तरी त्यांच्या उदारमतवादी चेहऱ्याखाली इस्लामी जिहादी राजवटच बळकट झाली. बांगलादेशात हिंदू विरोधात मोठा हिंसाचार उसळला. त्यामुळे बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब झाली. ती मोहम्मद युनूस यांनी सावरायचा प्रयत्न करताना त्यांनी ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. परंतु प्रत्यक्षात मोहम्मद युनूस यांच्या सरकारने बांगलादेशात हिंदू विरोधी आणि भारत विरोधी निर्णयांची मालिकाच लावली. तरीसुद्धा मोहम्मद युनूस यांना भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत.
मोहम्मद युनूस यांच्या राजवटीने बांगलादेशातील 700 कट्टरपंथीयांना तुरुंगातून सोडून दिले. हिंदू शिक्षकांना आणि हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांना राजीनामे द्यायला लावले. दुर्गापूजेवर बंधने लादली. अजानच्या आधी 5 मिनिटे दुर्गापूजेचे स्पीकर बंद करण्याचे बंधन घातले. पद्मा नदीतल्या हिल्सा मासे भारतात पाठवायला बंदी घातली. हे सगळे निर्णय हिंदू विरोधी आणि भारत विरोधी घेतले. तरीसुद्धा मोहम्मद युनूस यांना भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत.
बांगलादेशाला भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. मात्र, न्याय आणि समानतेच्या आधारावर असले पाहिजेत, असा दावा मोहम्मद युनूस यांनी केला.
– मोहम्मद युनूस म्हणाले :
– बांगलादेशाला भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. परंतु संबंध निष्पक्षता आणि समानतेवर आधारित असले पाहिजेत. बांगलादेशने पूर व्यवस्थापनावर द्विपक्षीय सहकार्यासाठी भारताबरोबर आधीच उच्चस्तरीय चर्चा सुरू केली आहे.
– दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी सार्कसाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. सार्कमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. जगाने बांगलादेशला सन्माननीय लोकशाही म्हणून ओळखवलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.
– अंतरिम सरकारने बांगलादेशातील निवडणूक यंत्रणा, न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासनसह सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोग स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. हे 6 आयोग 1 ऑक्टोबरपासून काम सुरू करतील आणि पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण करतील. या सुधारणांचा उद्देश सर्वांना समान हक्क सुनिश्चित करणे हा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more