सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत. ज्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर काहीच बोलायचे नाही,असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.Staying together and pushing back,, Congress state president Nana Patole criticizes Ajit Pawar

लोणावळा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पटोले म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते.



कुठल्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. या त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी. या त्रासामुळे कार्यकर्त्यांनी मानसिकदृष्ट्या खचू नये.

आपल्या हक्काचं असताना आपल्याला दिलं जात नाही, पण मी माझ्या कर्माने इथला पालकमंत्री बनेल अशी शपथ घेतली पाहिजे. आपल्या पक्षाचा माणूस या पालकमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघाले पाहिजे.

पटोले म्हणाले, मी स्वबळाबाबत बोलत तर त्रास होतो आणि मुख्यमंत्री बोलले तर ते ठीक आह.स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे.

Staying together and pushing back,, Congress state president Nana Patole criticizes Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात