विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: अमेरिकेतील ३६ प्रांत व वॉशिंग्टन डीसीने गुगल सर्च इंजिनविरुद्ध अँड्रॉइड अॅप स्टोअरच्या कायदेभंगाविषयी दावा दाखल केला आहे. गुगल प्ले स्टोअरने अनेक कंपन्यांशी विशेष करार करून अँड्रॉइड वापरकर्त्यांचा अॅप खरेदीसाठीचा दुसरा पर्याय निवडण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे.No other option for app purchase: 36 US states sue Google over lawsuits
नॉर्थ कॅरोलिना आणि टेनिसी प्रांतांच्या अॅटर्नी जनरल यांनी गुगल प्ले स्टोअरला स्पर्धानियमांच्या भंगाबद्दल जबाबदार धरले आहे.गुगल प्ले स्टोअरवरून खरेदी करण्यात येणाऱ्यां अॅपच्या किमतीपैकी ३० टक्के रक्कम युजरना गुगलला अदा करावी लागते. अनेक वर्षांपासून गुगल कंपनी इंटरनेटच्या रखवालदाराची भूमिका बजावत आहे.
पण आता सर्व डिजिटल उपकरणांचा गुगल रखवालदार झाला आहे. आपल्या प्रभावाने व्यावसायिक स्पर्धाच नष्ट केली जात आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या खिशातून गुगल अब्जावधी डॉलर बळकावत असून, युजरनी कोणते अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचे हेही गुगलच ठरवत आहे, असा आक्षेप या दाव्यात घेण्यात आला आहे.
गुगल प्ले स्टोअरव्यतिरिक्तच्या व्यासपीठावर आपले अॅप्लिकेशन युजरच्या निवडीसाठी ठेवण्यात गुगल तांत्रिक अडथळे निर्माण करते किंवा ते पूर्णपणे रोखते, असाही आरोप या दाव्यात आहे. गुगल प्ले स्टोअरव्यतिरिक्त उपलब्ध असणारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना गुगल फसवे सुरक्षाविषयक संदेश कम्प्युटर-मोबाइलवर झळकवते.
त्यामुळे गुगल प्ले स्टोअरऐवजी थेट ग्राहकांकडे आपली अॅप उत्पादने घेऊन जाणाºया उत्पादकांची कोंडी होते, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. गुगलने अनेक वर्षे अँड्रॉइडला ओपन सोर्स म्हणून मान्यता दिलेली नाही. गुगल बिलिंगद्वारे अॅपची खरेदी होताना प्रत्येक व्यवहारासाठी प्रोसेसिंग फी घेण्यात येते, याबद्दलही दाव्यात तक्रार करण्यात आली आहे.
अँड्रॉइड प्रणालीवर चालणारी अॅप बनवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना गुगल प्ले स्टोअरशिवाय अन्यत्र आपली अॅप झळकवण्यास मनाई केली जाते. याशिवाय गुगल प्ले स्टोअरवरून अॅपची खरेदी करताना गुगल संबंधित अॅप उत्पादित कंपनी व अँड्रॉइड युजर यांना ह्यगुगल प्ले बिलिंगद्वारेच आर्थिक व्यवहार करण्याचे बंधन घालण्यात येते, याकडेही या दाव्याद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more