विशेष प्रतिनिधी
नांदेड : शरद पवार महाराष्ट्राचा विकास केल्याच्या बाता मारतात. कृषिमंत्री म्हणून आपली कामगिरी अव्वल असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात शरद पवारांनी महाराष्ट्राला त्यांच्या 10 वर्षांच्या कृषिमंत्र्याच्या कारकिर्दीत फक्त 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले, तर मोदी सरकारने 10 वर्षांमध्ये तब्बल 7 लाख 15 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले, असे अमित शाह आज थेट आकड्यांमध्ये बोलले.Sonia, Pawar gave 1.91 lakh crore to Maharashtra in 10 years, Modi gave 7.15 lakh crore in 10 years; Amit Shah spoke in numbers!!
भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी सगळ्या आकड्यांची जंत्रीच देऊन सोनिया गांधी मनमोहन सिंग शरद पवार यांच्या सरकारचे वाभाडे काढले. त्यांनी विकासाचे सगळे आकडे जनतेसमोर मांडले.
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
अमित शाह म्हणाले :
महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धी उरलेली काँग्रेस. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, “तीन तिघाडा, काम बिघाडा” मी आपल्याला सांगायला आलोय की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी अर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला अर्ध केलंय. हे तीन आर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का???
तीन अर्ध्यांची ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिला तीन पाय आहेत, पण इंजिन अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचं आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसांतील मतभेदामुळे हे लोक फुटणार आहेत.
मी नांदेडच्या नागरिकांना विचारु इच्छितो, काश्मीर आपलं आहे की नाही? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात की, काश्मीरचा महाराष्ट्र आणि राजस्थानची काय संबंध? नांदेडचा बच्चा-बच्चा काश्मीरच्या लढाईसाठी तयार आहे. कलम 370 हटायला हवे होती की नाही?? काँग्रेस पक्ष 70 वर्षांपासून कलम 370 एका लहान बाळासारखं सांभाळून ठेवलं होतं. मोदींनी 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी कायमचं जोडण्याचं काम केले.
सोनिया, मनमोहन यांचं सरकार चाललं तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात दहशतवादी कारवाया करुन पळून जायचे. तुम्ही 2014 ला मोदींना पंतप्रधान बनवलं. मोदींनी काश्मीरला वेगळ्या दृष्टीकोनाने पाहिलं. त्यांच्या काळातही पुलवामा आणि उरी हल्ला झाला. पण मोदींनी दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मी शरद पवार यांना विचारतो, एक गोष्ट सांगा, 10 वर्षांपर्यत तुम्ही सोनिया, मनमोहन सरकारचे कर्ताधर्ता होते, तुम्ही 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं?? नांदेडकरांनो हिशेब मागयाला हवा की नाही? त्यांनी हिशेब द्यायला हवा की नको? पण ते देणार नाहीत. पण मी हिशेब देवून जातो. त्यांनी 10 वर्षात महाराष्ट्राला फक्त 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्षात 7 लाख 15 कोटी रुपये दिले आहेत.
– त्याखेरीज इन्फ्रास्ट्रकच्या विकासासाठी 3 लाख 90 हजार कोटी रुपये दिले. 75 हजार कोटी रुपये नॅशनल हायवेसाठी, 2 लाख 10 हजार कोटी रुपये रेल्वेसाठी, 4 हजार कोटी रुपये विमानतळासाठी आणि 1 लाख कोटी रुपये स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रोजक्टसाठी देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाची मंडळी महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा विकास करु शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App