जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, या अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हा अजेंडा कोणत्या विषयावर असेल? याचा खुलासा सरकारने केलेला नाही. या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर कारणे स्पष्ट करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. या विशेष अधिवेशनाबाबत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. ज्यामध्ये सोनियांनी विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत अजेंड्यावर प्रश्न विचारले आहेत. Sonia Gandhi wrote a letter to PM Modi,ॉ raised questions on the agenda of the special session of Parliament
विशेष अधिवेशनाचा अजेंडा विरोधकांना माहित नसल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. कोणतेही विशेष अधिवेशन बोलवण्यापूर्वी चर्चा होतात. ज्यावर सर्व खासदारांचे एकमत होत असते. विशेषत: विशेष अधिवेशनाचा अजेंडाही अगोदरच ठरवून त्यावर एकमत होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र विशेष बैठक बोलावण्याची ही पहिलीच वेळ असून अजेंडा निश्चित झालेला नाही. शिवाय यावर एकमत होण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
या विशेष अधिवेशनात सरकारी कामकाजासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचे सोनिया म्हणाल्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रात पंतप्रधान मोदींना 9 मुद्द्यांवर चर्चा करण्यास सांगितले आहे. यामध्ये महागाई, एमएसएमई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी, जातिगणना, केंद्र-राज्य संबंध, चीन सीमा आणि सामाजिक सलोखा यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App