विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुलाच्या मदतीला आई धावली पण भाषण केले “सुरक्षित” ठिकाणी!!, असेच राजधानीत घडले.
त्याचे झाले असे :
लोकसभेतले विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेची सुरुवात करताना मोठे भाषण केले. परवा राहुल गांधींचे लोकसभेत ते भाषण झाल्यानंतर काल भाजपच्या सगळ्याच खासदारांनी त्यांच्या भाषणाचे पुरते वाभाडे काढले होते. राहुल गांधींनी बजेट हलवा कार्यक्रमात जातीचा मुद्दा घुसवून स्वतःच फाऊल करून घेतला होता. त्यामुळे भाजपच्या सगळ्या नेत्यांना त्यांना ठोकण्याची संधी मिळाली. ती संधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अनुराग ठाकूर यांनी पुरेपूर साधून घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी देखील राज्यसभेत राहुल गांधींचे नाव न घेता त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढले.
Nirmala Sitharaman : अर्थमंत्री सीतारामन यांचा संसदेत हल्लबोल, यूपीएने मंत्र्यांना हलवा वाटण्याची परंपरा आणली; तेव्हा कोणी नाही विचारले अधिकाऱ्यांत किती SC-ST-OBC?
त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत निष्प्रभ ठरले. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता लोकसभेत निष्प्रभ ठरल्याचे पाहून राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज समोर आल्या आणि त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पण हा हल्लाबोल करताना सोनिया गांधींनी “सुरक्षित” ठिकाण निवडले. वास्तविक त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत भाषण करता आले असते. पण त्यांनी आज काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत भाषण करून मोदी सरकारला ठोकले. त्यामुळे सोनिया गांधींच्या भाषणाला भाजपचे नेते संसदेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये उत्तर देणार नाहीत, असा काँग्रेस नेत्यांनीच स्वतःचा समज करून घेतला आहे.
मोदी सरकारला ठोकताना सोनिया गांधी जातनिहाय जनगणनेपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत सगळे जुने विषय उगाळले. बजेटच्या हलवा समारंभाबाबत मात्र त्या काही बोलल्या नाहीत. लोकसभेच्या निकालातून मोदी सरकार काही धडा घेईल, असे आम्हाला वाटले होते, पण मोदी सरकारच्या वर्तणुकीमध्ये काहीच फरक दिसत नाही. ते स्वतःच्याच भ्रमात राहून देशावर राज्य करत आहेत, अशी टीका सोन्या गांधींनी केली. पण ही टीका करताना काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीचे “सुरक्षित” ठिकाणी निवडले. जिथून त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर मिळणार नाही असे ते ठिकाण होते!! त्यामुळे एकीकडे राहुल गांधींच्या मदतीला त्यांना धावता आले आणि त्याच वेळी “सुरक्षित” ठिकाणाहून भाषण केल्यामुळे आता त्यांना राज्यसभेत भाषण केले नाही तरी चालणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App