UGC – NET पेपर फुटीच्या चौकशीसाठी सरकार गंभीर; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या “नीट” परीक्षेतील अनियमिततेवरून सुरू असलेला गदारोळ ताजा असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतही (NET) अनियमतता आढळून आली. याच कारणास्तव मंगळवारी (१८ जून) घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली. Some irregularities have come to the notice of the government

परीक्षांमध्ये गडबड होत असल्याकारणाने देशभरातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. तसेच विरोधकांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. यानंतर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करत असल्याचे जाहीर केले.

परीक्षांच्या संदर्भातली सगळी जबाबदारी नॅशनल टेस्टिंग कमिटीची आहे. त्यात काही त्रुटी आढळले आहेत त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ही जबाबदारी सरकार निश्चित पार पाडेल, असे आश्वासन धर्मेंद्र प्रधान यांनी दिले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संबंधित परीक्षा लवकरच पुन्हा जाहीर करण्यात येईल. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेऊ. त्याचबरोबर संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहील, याची हमी देखील धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

बिहार मधल्या “नीट” परीक्षेतील पेपर फुटीसंदर्भात पटना पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन गुन्हेगारांना पकडले केंद्र सरकारकडे त्या संदर्भात तपशीलवार माहिती पाठवली. “नीट” परीक्षेतील पेपर फुटीचा देशातल्या करोडो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होऊ देणार नाही, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

Some irregularities have come to the notice of the government

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात