विशेष प्रतिनिधी
लातेहार – झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ‘करम डाली’च्या विर्सजनादरम्यान तलावात बुडून सात मुलींचा मृत्यू झाला. सहा मुली एकाच कुटुंबातील आहेत. मृत मुलींचा वयोगट हा १२ ते २० आहे.काल रात्री बुकरू गावात करम पूजा पार पडली. six girls drawon in lake
त्यानंतर आज गावकरी आणि मुली करम डालीचे विसर्जन करण्यासाठी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास मननडीह येथील तलावाजवळ गेले. त्याठिकाणी अंघोळ करणाऱ्या सातही मुली पाण्यात गेल्या आणि बुडाल्या. सर्वांचे मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे.
गावातील दहा मुलींचा गट करम डालीला घेऊन गावातील रेल्वेलाइनजवळ असलेल्या एका तलावात विसर्जनासाठी गेला. झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पूजेची टोपली पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा आहे. यावेळी स्नान करताना सात मुली पाण्यात खोलवर गेल्या त्यांचा बुडून मृत्यू झाला.
तलावाजवळ उभ्या असलेल्या महिलांनी हाका मारल्या. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारल्या. तोपर्यंत चार मुलींचा मृत्यू झाला होता. उर्वरित तीन मुलींचा बालूमाथ आरोग्य केंद्रात नेताना वाटेत मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App