Singer KK : मृत्यू अनैसर्गिक, संशयास्पद; डोके आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा

वृत्तसंस्था

कोलकाता : बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ ​​केके यांचे निधन झाले. पण त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढले आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केके यांच्या डोक्यावर आणि चेह-यावर जखमांच्या खुणा आढळल्याने, केके यांच्या मृत्यूप्रकरणी कोलकाता पोलीस आयोजक आणि हाॅटेल कर्मचा-यांची चौकशी करत आहेत. Singer KK: Death is unnatural, suspicious

केके यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

दिलीप घोष यांनी राज्य सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ती पद्धत योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. काॅन्सर्ट दरम्यान तिथला एसी बंद होता, तसेच गर्दीदेखील होती. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी तेथे होती. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहित नाही, कारण कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये एक्साइटमेंट असते.

बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ ​​केके यांचे मंगळवारी निधन झाले. 53 वर्षीय केके यांनी मंगळवारी कोलकाता येथील नजरुल मंच येथे महाविद्यालयीन कार्यक्रमात सादरीकरण केले होते. त्यानंतर केके हॉटेलमध्ये गेले आणि तिथे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कोलकाता येथील सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

केके यांचा पार्थिव देह कोलकत्यातील रवींद्र भवन येथे करण्यात आला. तेथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली. केके यांच्या पार्थिवावर मुंबईत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Singer KK: Death is unnatural, suspicious

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात